YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 23:33-40

यिर्मयाह 23:33-40 MRCV

“या लोकांपैकी, या संदेष्ट्यांपैकी, किंवा याजकांपैकी कोणी तुला विचारेल, ‘अरे यिर्मयाह, आज याहवेहकडून काय संदेश आहे?’ तेव्हा तू त्यांना असे उत्तर द्यावेस, ‘कसला संदेश? मी तुम्हाला दूर लोटून टाकणार आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन. तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता. तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता. म्हणून मी निश्चितच तुम्हाला विसरेन आणि तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या शहराला माझ्या समक्षतेतून घालवून देईन. मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.”

यिर्मयाह 23 वाचा