YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 14:1-4

शास्ते 14:1-4 MRCV

शमशोन खाली तिम्नाह येथे गेला आणि तिथे त्याने एक सुंदर पलिष्टी स्त्री पाहिली. तिथून परत आल्यावर, तो आपल्या आईवडिलांना म्हणाला, “मी तिम्नाह इथे एक पलिष्टी स्त्री पाहिली आहे; मला ती माझी पत्नी करून द्या.” त्याच्या आईवडिलांनी प्रत्युत्तर दिले, “तुझ्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या सर्व लोकांमध्ये स्वीकार करण्यायोग्य स्त्री नाही काय? सुंता न झालेल्या पलिष्टी लोकांकडे पत्नी मिळविण्यासाठी जावे काय?” परंतु शमशोनाने आपल्या वडिलांना म्हटले, “मला तीच हवी आहे. ती माझ्यासाठी योग्य आहे.” (त्याच्या आईवडिलांना हे कळले नाही की हे याहवेहकडून आहे, जे पलिष्ट्यांना विरोध करण्याच्या संधीची वाट पाहत होते; कारण त्यावेळी ते इस्राएलावर राज्य करीत होते.)

शास्ते 14 वाचा