YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 49:1-12

यशायाह 49:1-12 MRCV

हे द्वीपांनो, माझे ऐका; हे दूरवरील देशांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या: माझा जन्म होण्यापूर्वीच याहवेहने मला बोलाविले; गर्भाशयात असतानाच त्यांनी माझे नाव उच्चारले. त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत, त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे; त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे. ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस; इस्राएला, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन.” मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले. मी माझे सामर्थ्य निरुपयोगीच खर्ची घातले, तरीपण माझे प्रतिफळ म्हणजे याहवेहचा वरदहस्त आणि माझे बक्षीस माझ्या परमेश्वराकडे आहे.” आणि आता याहवेह म्हणतात— याकोबाला त्यांच्याकडे परत आणावे व इस्राएलला स्वतःसाठी एकत्र करावे, यासाठी त्यांचा सेवक व्हावा म्हणून ज्याची गर्भाशयातच घडण केली, आणि हे काम देऊन माझा बहुमान केला व माझे परमेश्वर माझे सामर्थ्य आहेत— ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.” ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे, जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला: उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर, याहवेह असे म्हणतात— “जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील, अधिपती तुला लवून मुजरा करतील, कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत, जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.” याहवेह असे म्हणतात: “माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन, आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन; मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून, तुमची भूमी पुनर्स्थापित होईल, आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील, बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’ “ते रस्त्याच्या काठावर चरतील आणि प्रत्येक नापीक टेकड्यांवर त्यांना गवत सापडेल. ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत. वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील आणि त्यांना पाण्याच्या झर्‍यांजवळून चालवितील. मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन, आणि माझे महामार्ग उंचावले जातील. पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील— काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून, तर काही सीनीम प्रांतातून येतील.”

यशायाह 49 वाचा