YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 12:6-11

इब्री 12:6-11 MRCV

कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात, आणि ज्या प्रत्येकाला मूल म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.” तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात, आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे! त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस त्यांनी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.

इब्री 12 वाचा