YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 48:11-16

उत्पत्ती 48:11-16 MRCV

इस्राएल योसेफाला म्हणाला, “मी तुला परत पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते, पण परमेश्वराने मला तुझे पुत्रही पाहू दिलेत.” नंतर योसेफाने त्यांना इस्राएलाच्या मांडीवरून बाजूला केले आणि जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. मग योसेफाने दोघांना घेतले आणि एफ्राईमला योसेफाच्या उजव्या व इस्राएलाच्या डाव्या हातास आणि मनश्शेहला योसेफाच्या डाव्या आणि इस्राएलाच्या उजव्या हातास असे त्याच्याजवळ नेले. परंतु इस्राएलने त्याचा उजवा हात पुढे केला आणि तो एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला, जरी तो धाकटा होता आणि हात ओलांडून त्याने आपला डावा हात मनश्शेहच्या डोक्यावर ठेवला, जरी मनश्शेह प्रथम जन्मलेला होता. नंतर त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या परमेश्वरापुढे माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक विश्वासाने चालले, तेच परमेश्वर आजपर्यंत माझ्या जीवनाचे मेंढपाळ राहिले आहे, ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, ते या मुलांना आशीर्वादित करोत. माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुलेबाळे व गोत्र लाभोत.”

उत्पत्ती 48 वाचा