अशा रीतीने इस्राएलचे पुत्र इतर लोकांबरोबर इजिप्तमध्ये धान्य खरेदीसाठी आले, कारण दुष्काळ कनान देशातही पडला होता. योसेफ हा इजिप्त देशाचा अधिकारी असल्यामुळे तो सर्व लोकांना धान्यविक्री करीत असे. जेव्हा त्याचे भाऊ तिथे आले, त्यांनी त्याच्यापुढे जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला. योसेफाने त्यांना बघताच ओळखले तरी अपरिचितासारखे वागून दरडावून विचारले, “तुम्ही कुठून आला आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “कनान देशाहून आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलो आहोत.”
उत्पत्ती 42 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 42:5-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ