YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:39-46

उत्पत्ती 41:39-46 MRCV

मग फारोह योसेफाला म्हणाला, “ज्याअर्थी परमेश्वराने तुला या स्वप्नांचा अर्थ प्रगट केला आहे, त्याअर्थी देशामध्ये तुझ्यासारखा चतुर आणि सुज्ञ मनुष्य कोणीच नाही. म्हणून तू माझ्या महालाचा अधिकारी होशील आणि माझे सर्व लोक तुझ्या अधीन होतील. केवळ सिंहासनासाठीच मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.” मग फारोह योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तुला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे.” फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले. फारोहने योसेफास म्हटले, “मी इजिप्त देशाचा राजा फारोह आहे, पण संपूर्ण इजिप्त देशभर तुझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा हात किंवा पाय उचलणार नाही.” फारोहने त्याला सापनाथ-पानेह हे नाव दिले, आणि त्याला ओन येथील पोटीफेरा याजकाची कन्या आसनथ ही पत्नी करून दिली. योसेफ संपूर्ण इजिप्त देशभर फिरला. योसेफाने फारोह राजाच्या सेवेत प्रवेश केला, तेव्हा तो तीस वर्षाचा होता. नंतर राजधानी सोडून तो इजिप्त देशभर प्रवास करू लागला.

उत्पत्ती 41 वाचा