YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 36:1-19

उत्पत्ती 36:1-19 MRCV

एसाव म्हणजे एदोम याची वंशावळ ही: एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ. एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला. एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले. मग एसाव आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला. कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती. म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली. सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी. एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल. एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते. एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती. रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती. एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज, कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते. एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे. एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले. हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.

उत्पत्ती 36 वाचा