YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 32:24-28

उत्पत्ती 32:24-28 MRCV

तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली. याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला. मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.” मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.” यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”

उत्पत्ती 32 वाचा