माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.
गलातीकरांस 5 वाचा
ऐका गलातीकरांस 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलातीकरांस 5:2-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ