बंधूंनो आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी केला ती मनुष्याकडून आलेली नाही. कोणत्याही व्यक्तीकडून मी ते स्वीकारलेले नाही किंवा मला ते शिकविण्यात आलेले नाही; तर मला ही शुभवार्ता येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाली आहे. कारण तुम्ही ऐकलेच आहे की, यहूदी धर्मात असताना माझे पूर्वीचे जीवन कसे होते, कशाप्रकारे उग्र रूप धारण करून मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला आणि त्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न केला. माझ्या लोकांमध्ये माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा मी यहूदी धर्मसंप्रदायात अधिक पुढे जात होतो आणि माझ्या पूर्वजांच्या परंपरेविषयी अत्यंत आवेशी होतो. परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलाविले, त्यांना हे योग्य वाटले की त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूंच्या शुभवार्तेची घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये. माझ्या आधी जे प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी मी यरुशलेमपर्यंत गेलो नाही, परंतु मी अरबस्थानात गेलो. नंतर मी दिमिष्कास परत आलो. नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो. प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्या प्रेषितांना मी भेटलो नाही. मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही.
गलातीकरांस 1 वाचा
ऐका गलातीकरांस 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलातीकरांस 1:11-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ