YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 37:4-10

यहेज्केल 37:4-10 MRCV

तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका! या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” तेव्हा मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. आणि मी भविष्यवाणी करीत असता, मोठा आवाज, खडखडाट झाला, तेव्हा एक हाड दुसऱ्या हाडाशी, अशी हाडे एकत्र जडली. तेव्हा मी पाहिले, स्नायू आणि मांस त्यांच्यावर आले आणि कातडीने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता. तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ” याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले.

यहेज्केल 37 वाचा