YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 9:20-22

एस्तेर 9:20-22 MRCV

मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली. या पत्रांच्या द्वारे अदार महिन्याच्या चौदाव्या व पंधराव्या दिवशी वार्षिक आनंदोत्सव म्हणून जाहीर केला. कारण त्या दिवशी यहूदी लोकांचे त्यांच्या शत्रूपासून रक्षण झाले आणि त्यांच्या दुःखाचे हर्षात आणि त्यांच्या शोकाचे आनंदोत्सवात रूपांतर झाले. आणि हा दिवस मेजवान्या देऊन व एकमेकांना सर्व प्रकाराच्या भेटी देऊन व गोरगरिबांना दानधर्म करून आनंदाने साजरा करावा असे त्याने पत्राद्वारे त्यांना कळविले.

एस्तेर 9 वाचा