YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 1:10-13

दानीएल 1:10-13 MRCV

परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.” दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्‍याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला, “कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या. मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्‍या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.”

दानीएल 1 वाचा