आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला. फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले. अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत. त्या शहरात मोठा आनंद झाला होता. आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे. म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते. ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते. परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला. शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला. यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले. ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.” पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला! या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही. तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील
प्रेषित 8 वाचा
ऐका प्रेषित 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 8:4-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ