YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 6:7-15

प्रेषित 6:7-15 MRCV

मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले. आता स्तेफन परमेश्वराच्या कृपेने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असा मनुष्य होता आणि त्याने लोकांमध्ये मोठी आश्चर्ये व चिन्हे केली होती. परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयेकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले. परंतु स्तेफन जे आत्म्याच्या ज्ञानाद्वारे बोलला त्याला विरोध करण्यास ते समर्थ ठरले नाहीत. मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले की, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.” अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथवीले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले. त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले, व त्यांनी अशी साक्ष दिली की, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो. ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.” आणि न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे एकाग्रतेने पाहत असताना त्यांना स्तेफनाचा चेहरा देवदूताच्या चेहर्‍यासारखा दिसला.

प्रेषित 6 वाचा

प्रेषित 6:7-15 साठी चलचित्र