YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 16:25-34

प्रेषित 16:25-34 MRCV

मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते. अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सार्‍या कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले. तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सारे दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता. परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!” तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराजांनो, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?” त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभुचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.

प्रेषित 16 वाचा

प्रेषित 16:25-34 साठी चलचित्र