YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 23:8-17

2 शमुवेल 23:8-17 MRCV

दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे ही: तहकेमोनचा योशेब-बश्शेबेथ तीन सेनापतींचा प्रमुख होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात आठशे लोकांना मारून टाकले. त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते, परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला. त्याच्यानंतर अगी हरारी याचा पुत्र शम्माह होता. मसूरांनी भरलेले शेत असलेल्या एका ठिकाणी पलिष्टी एकत्र जमले तेव्हा इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता. परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला. हंगामाच्या वेळी, जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती, तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेकडे आले. त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती. दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!” तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले. दावीद म्हणाला, “मी असे करणे माझ्यापासून दूर असो, हे याहवेह! ज्या पुरुषांनी आपला जीव धोक्यात घालून आणले, त्यांचे ते रक्त नाही काय?” म्हणून दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.

2 शमुवेल 23 वाचा