YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 23:18-39

2 शमुवेल 23:18-39 MRCV

जेरुइयाहचा पुत्र योआबचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांवर उगारून त्यांना मारून टाकले होते, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता. या तिघांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला नाही काय? तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. कबसेल येथील एक शूर मनुष्य होता, जो यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे बर्फाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले. त्याने एका बलाढ्य इजिप्ती मनुष्याला सुद्धा जिवे मारले होते. जरी त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, बेनाइयाह केवळ आपली काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला मारून टाकले. यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती. इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले. तीस जण येणेप्रमाणे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान, हरोदी शम्माह, हरोदी एलीका, पालती हेलेस, तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा, अनाथोथचा अबिएजेर, हुशाथचा सिब्बखय, अहोह येथील सलमोन, नटोफाथी माहाराई, नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेब, गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तई, पिराथोनचा बेनाइयाह, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दै, अर्बाथचा अबी-अल्बोन, बहरहूमचा अजमावेथ, शालबोनचा एलीहबा, याशेनाचे पुत्र, योनाथान हरार येथील शम्माहचा पुत्र, हरार येथील शारारचा पुत्र अहीयाम, माकाथी अहसबैचा पुत्र एलिफेलेत, गिलोनी अहीथोफेलचा पुत्र एलीयाम, कर्मेलचा हेस्रो, अर्बी येथील पारई, सोबाह येथील हागरीचा पुत्र, नाथानचा पुत्र इगाल, गादी बानी; अम्मोनी सेलेक, बैरोथचा नाहाराई, जो जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक होता, इथ्री येथील ईरा, इथ्री येथील गारेब आणि उरीयाह हिथी.

2 शमुवेल 23 वाचा