चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळ काढला, परंतु बाबेलच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि सिद्कीयाह राजाला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते, आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. त्यांनी सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या पुत्रांचा वध केला. मग त्यांनी त्याचे डोळे काढले व त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले.
2 राजे 25 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 राजे 25:3-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ