YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 18:13-18

2 राजे 18:13-18 MRCV

हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत आणि सोन्याचे तीस तालांत यांची मागणी केली. तेव्हा हिज्कीयाह राजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील तिजोरीत असलेली सर्व चांदी त्याला दिली. यावेळी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिराची दारे व खांबावर मढविलेले सोने काढले व ते अश्शूरच्या राजाला दिले. अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले. त्यांनी राजाला बोलाविले; तेव्हा त्याच्या राजवाड्याचा कारभारी एल्याकीम जो हिल्कियाहचा पुत्र, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र होता हे त्याच्याकडे गेले.

2 राजे 18 वाचा