ते ख्रिस्ताचे सेवक आहेत ना? मी अधिक आहे. असे मी वेड्यासारखे बोलतो! अधिक श्रम केले आहे, वारंवार तुरुंगात पडलो आहे, तीव्र फटके खाल्ले आणि अनेक वेळा मृत्यूला तोंड दिले. यहूद्यांनी पाच वेळेला एक कमी चाळीस फटक्यांची मला शिक्षा दिली. तीन वेळा मला छड्यांनी मारण्यात आले. एकदा मला धोंडमार झाला. तीन वेळा माझे तारू फुटले, एक रात्र आणि एक दिवस मी समुद्रात घालविला. मी सतत प्रवास केले आहेत आणि नद्यांची संकटे, लुटारूंची संकटे, यहूदी लोकांची संकटे, गैरयहूदीय लोकांची संकटे, शहरातील संकटे, खेड्यातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या विश्वासणार्यांपासून संकटे. मी श्रम व कष्ट केले आणि अनेकदा झोपेशिवाय राहिलो आहे. अनेक वेळा मी उपाशी व तान्हेला होतो; पुष्कळदा भोजनाशिवाय राहिलो आहे; मी थंडीने कुडकुडलो व नग्न होतो. मग या व्यतिरिक्त, दररोज सर्व मंडळ्यांचे चिंतेचे ओझे माझ्यावर आहे.
2 करिंथकरांस 11 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथकरांस 11:23-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ