YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 36:15-21

2 इतिहास 36:15-21 MRCV

याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वरानी त्यांच्या संदेष्ट्यांच्याद्वारे त्यांना वारंवार संदेश पाठवले, कारण त्यांनी त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या निवासस्थानावर दया केली होती. परंतु त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत परमेश्वराच्या संदेष्ट्यांची चेष्टा केली, याहवेहचा राग त्यांच्या लोकांविरुद्ध चेतवेपर्यंत त्यांच्या शब्दांचा तिरस्कार केला आणि त्यांच्या संदेष्ट्यांची थट्टा केली. याहवेहनी खाल्डियन लोकांच्या राजाला त्यांच्याविरुद्ध आणले, ज्यांनी त्यांच्या तरुण पुरुषांना मंदिरात तलवारीने मारले आणि तरुण पुरुष किंवा तरुण स्त्रिया, वृद्ध किंवा जे अशक्त होते त्यांनाही सोडले नाही. परमेश्वराने त्या सर्वांना नबुखद्नेस्सरच्या हाती दिले. ज्याने परमेश्वराच्या मंदिरातील मोठ्या आणि लहान सर्व मौल्यवान वस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील खजिने आणि राजा आणि त्याचे अधिकारी, यांचे खजिने बाबेलला नेले. त्यांनी परमेश्वराच्या मंदिराला आग लावली आणि यरुशलेमचे तट पाडून टाकले; त्यांनी सर्व राजवाडे जाळले आणि तेथील सर्व मौल्यवान वस्तूंचा नाश केला. तलवारीच्या घातापासून सुटलेल्या लोकांना तो बाबेलला बंदिवासात घेऊन गेला आणि पर्शियाचे राज्य सत्तेवर येईपर्यंत ते त्याचे आणि त्याच्यानंतर येणाऱ्यांचे सेवक झाले. भूमीने शब्बाथाच्या विश्रांतीचा आनंद घेतला; यिर्मयाहने सांगितलेल्या याहवेहच्या वचनाच्या पूर्णतेची सत्तर वर्षे होईपर्यंत त्या भूमीने तिच्या उजाडपणाच्या सर्व वेळेत विसावा घेतला.

2 इतिहास 36 वाचा