YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 5:3-4

1 शमुवेल 5:3-4 MRCV

जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले. परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.