तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली. आणि तिने एक शपथ घेतली, ती म्हणाली, “हे सर्वसमर्थ याहवेह, जर तुम्ही तुमच्या दासीच्या दुर्दशेकडे लक्ष द्याल आणि माझी आठवण कराल आणि तुमच्या दासीला विसरणार नाही परंतु तिला एक पुत्र द्याल, तर मी त्याला त्याच्या आयुष्याचे सर्व दिवस याहवेहसाठी देईन आणि त्याच्या डोक्यावर कधीही वस्तरा फिरणार नाही.” ती याहवेहकडे प्रार्थना करीत असता, एली तिच्या मुखाकडे पाहत होता. हन्नाह तिच्या मनात प्रार्थना करीत होती, आणि तिचे ओठ हालत होते, परंतु तिचा आवाज मात्र ऐकू येत नव्हता. एलीला वाटले की ती नशेत आहे आणि एली तिला म्हणाला, “किती वेळ तू नशेत राहशील? मद्यपान सोडून दे.” “तसे नाही, माझ्या स्वामी,” हन्नाहने उत्तर दिले, “मी फार त्रस्त झालेली स्त्री आहे. मी द्राक्षारस किंवा मद्य घेतले नाही; मी माझे हृदय याहवेहकडे मोकळे करीत होते. तुमच्या दासीला दुष्ट स्त्री असे समजू नका; मी या ठिकाणी वेदना आणि तीव्र दुःखाने प्रार्थना करीत आहे.” तेव्हा एलीने उत्तर दिले, “शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो.” ती म्हणाली, “तुमची दासी तुमच्या दृष्टीत कृपा पावो.” नंतर ती आपल्या मार्गाने निघून गेली आणि तिने अन्न सेवन केले आणि त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही.
1 शमुवेल 1 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 शमुवेल 1:10-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ