एफ्राईम येथील डोंगराळ भागात रामाथाईम-सोफीम या गावात एलकानाह नामक एक मनुष्य राहत होता, जो यरोहामचा पुत्र होता, तो एलीहूचा पुत्र, तो तोहूचा पुत्र, तो सूफाचा पुत्र, तो एफ्राईम गोत्रातील होता. त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते. दरवर्षी हा मनुष्य त्याच्या नगरापासून शिलोह येथे सर्वसमर्थ याहवेहची उपासना आणि यज्ञ करण्यासाठी जात असे, जिथे एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे याहवेहचे याजक होते. यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे. परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते. कारण याहवेहने हन्नाहचे उदर बंद केले होते, यामुळे तिची सवत तिला चिडवून त्रास देत असे.
1 शमुवेल 1 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 शमुवेल 1:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ