YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 7:33-35

1 करिंथकरांस 7:33-35 MRCV

तरी विवाहित पुरुष जगातील गोष्टींचा आणि आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करतो. त्याच्या आवडीनिवडी विभागल्या जातात. अविवाहित स्त्री वा कुमारिकेचे प्रभूला शरीराने व आत्म्याने संतुष्ट करण्याचे ध्येय असते, परंतु विवाहित स्त्री जगाच्या गोष्टींविषयी व आपल्या पतीला कसे संतोषवावे याकडे लक्ष देते. हे मी तुमच्या भल्यासाठी सांगत आहे, तुम्हावर निर्बंध घालण्यासाठी नव्हे, यासाठी की तुम्ही योग्यप्रकारे जीवन जगावे आणि तुमचे मन विचलित न होता प्रभूला पूर्णपणे समर्पित व्हावे.