याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही. निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत. आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो. त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात. तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो. ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.
1 करिंथकरांस 12 वाचा
ऐका 1 करिंथकरांस 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 करिंथकरांस 12:3-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ