YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 11:4-9

1 इतिहास 11:4-9 MRCV

नंतर दावीद व इस्राएलचे सर्व लोक मिळून यरुशलेमला (म्हणजे यबूसला) गेले. तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे. दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला. तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले. दावीदाने मिल्लोपासून गडाभोवतालच्या शहराच्या भागाचा विस्तार केला आणि योआबाने बाकी यरुशलेमची पुनर्बांधणी केली. आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते.

1 इतिहास 11 वाचा