YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 1:43-54

1 इतिहास 1:43-54 MRCV

इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते. बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला. हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते. मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला. सामलाहच्या मृत्यूनंतर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला. शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला. बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती. हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ, ओहोलीबामाह, एलाह, पीनोन, केनाज, तेमान, मिब्सार, मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी होते.

1 इतिहास 1 वाचा