YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 12:14-21

रोमकरांना 12:14-21 MACLBSI

तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा धर्मशास्त्रलेख आहे: ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन’, असे प्रभू म्हणतो. उलटपक्षी, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर चांगुलपणाने वाइटाला जिंक.