YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 12:13-18

रोमकरांना 12:13-18 MACLBSI

पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, होय, आशीर्वाद द्या; शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेऊ नका, तर लीन वृत्तीच्या लोकांच्या सहवासात रहा. तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचा दावा करू नका. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे चांगले आहे, ते करण्याकडे लक्ष ठेवा. सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.