माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची, हे पाहण्यास मी मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे केस पांढऱ्या लोकरीसमान किंवा बर्फासारखे शुभ्र होते आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीतून विशुद्ध केलेल्या चकचकीत सोनपितळ्यासारखे होते आणि त्याची वाणी गर्जना करणाऱ्या धबधब्यासारखी होती. त्याने त्याच्या उजव्या हातात सात तारे धरले होते, आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याचा चेहरा मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतका तेजस्वी होता. मी त्याला पाहिले, तेव्हा मी त्याच्या पायाजवळ मृतप्राय अवस्थेत पडलो. त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, “भिऊ नकोस! जो पहिला व शेवटचा आणि जो जिवंत आहे तो मी आहे! मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.
प्रकटी 1 वाचा
ऐका प्रकटी 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 1:12-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ