येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण:ज्या गोष्टी लवकरच जरूर घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्याने आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहान ह्याला हे कळविले. योहानने जे जे पाहिले आहे, ते सर्व सांगितले आहे. देवाकडून मिळालेला संदेश व येशू ख्रिस्ताने उघड करून दाखविलेले सत्य यांविषयीचा हा योहानचा वृत्तान्त आहे. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे. योहानकडून आशिया प्रांतातील सात ख्रिस्तमंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार त्याच्याकडून; त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्याकडून आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे आणि ज्याने आपल्याला आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजकांचे राज्य असे तयार केले आहे, त्या येशू ख्रिस्ताला वैभव व सामर्थ्य युगानुयुगे असोत, आमेन. पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.
प्रकटी 1 वाचा
ऐका प्रकटी 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 1:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ