मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो.
फिलिप्पैकरांना 4 वाचा
ऐका फिलिप्पैकरांना 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांना 4:10-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ