YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 4:1-9

मार्क 4:1-9 MACLBSI

येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते. तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “ऐका, एक पेरणारा पेरणी करायला निघाला. तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले. सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांत पडले. काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटली म्हणून त्याला पीक आले नाही. परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.” पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!”

मार्क 4:1-9 साठी चलचित्र