लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. तेव्हा तो त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य.
मत्तय 5 वाचा
ऐका मत्तय 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 5:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ