YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:39-46

मत्तय 26:39-46 MACLBSI

काहीसे पुढे जाऊन त्याने जमिनीवर लोटांगण घातले व अशी प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीदेखील माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” त्याने दुसऱ्यांदा पुढे जाऊन प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, मी प्यायल्याशिवाय हा प्याला दूर केला जाणार नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” त्याने पुन्हा येऊन पाहिले, तर ते झोपलेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. त्यानंतर तो त्याच्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पाहा! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”