अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व श्रद्धा ह्यांकडे दुर्लक्ष करता. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ह्यादेखील तुम्ही करायच्या होत्या. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही माशी गाळून काढता व उंट गिळून टाकता! अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतून ती अत्याचार व असंयम ह्यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुश्या, प्रथम वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून त्या मेलेल्यांच्या हाडांनी व घाणीने भरलेल्या असतात. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आतून तुम्ही ढोंगाने व दुष्टपणाने भरलेले आहात.
मत्तय 23 वाचा
ऐका मत्तय 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 23:23-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ