YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:24-31

मत्तय 10:24-31 MACLBSI

गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास महान नाही. शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, एवढे पुरे. कुटुंबप्रमुखाला बाल्जबूल म्हणतात तर कुटुंबातील सदस्यांना कितीतरी अधिक वाईट नावे ठेवतील! तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो त्याची उजेडात पुनरुक्ती करा आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता, ते छपरावरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा. दोन चिमण्यांची किंमत ती काय? पण तुमच्या पित्याच्या संमतीशिवाय त्यांतून एकही जमिनीवर पडत नाही. तसेच तुमच्या डोक्यावरचे सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे!