YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 2:25-35

लूक 2:25-35 MACLBSI

त्या समयी शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेममध्ये राहात होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य होता. तो इस्राएलच्या मुक्तीची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होता. ‘प्रभूच्या वचनदत्त ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही’, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शिमोन मंदिरात आला. नियमशास्त्रानुसार विधी करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने येशू बाळाला आपल्या हातात घेऊन देवाचा गौरव करीत म्हटले, “हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे. आता आपल्या दासाला शांतीने जाऊ दे; कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना तुझी इच्छा प्रकट व्हावी म्हणून प्रकाश व तुझ्या इस्राएली लोकांचे वैभव आहे.” येशूविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचे वडील व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलमध्ये अनेकांचा नाश व उद्धार व्हावा म्हणून व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह व्हावे म्हणून परमेश्वराने ह्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघड होतील व तुझ्या अंतःकरणात तलवार भोसकली जाईल.”

लूक 2 वाचा

ऐका लूक 2