रस्त्याने जात असता येशूने एका जन्मांध माणसाला पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, कोणी पाप केले, ह्याने की ह्याच्या आईबापांनी, म्हणून हा असा आंधळा जन्मला?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले म्हणून नव्हे, पण ह्याच्याठायी देवाचे कार्य दिसावे ह्यासाठी. ज्याने मला पाठवले त्याची कामे मी दिवस आहे तोपर्यंत केली पाहिजेत. रात्र येणार आहे, मग कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” असे बोलून तो जमिनीवर थुंकला. थुंकीने त्याने माती ओली केली व ती त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांना लावली आणि त्याला म्हटले, “जा, शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यावर तुझा चेहरा धुऊन घे.” त्याने जाऊन त्याचा चेहरा धुतला. त्याला दिसू लागले व तो परत आला. हे पाहून त्याचे शेजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही का?” कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा दिसतो.” तेव्हा तो स्वतः म्हणाला, “मी तोच आहे.”
योहान 9 वाचा
ऐका योहान 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 9:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ