YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:1-13

योहान 4:1-13 MACLBSI

येशू योहानपेक्षा अधिक शिष्य मिळवून त्यांना बाप्तिस्मा देत आहे, हे परुश्यांच्या कानी गेले आहे, असे जेव्हा प्रभूला कळले, (येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, पण त्याचे शिष्य देत असत.) तेव्हा तो यहुदिया सोडून पुन्हा गालीलमध्ये जायला निघाला. त्याला शोमरोनमधून जावे लागले. तो शोमरोनमधून सुखार नावाच्या नगरास आला. ते याकोबने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबची विहीर होती. प्रवासाने दमलेला येशू त्या विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेथे शोमरोनची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला दे.” त्याचे शिष्य शिधासामग्री विकत घ्यायला नगरात गेले होते. ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला मागता हे कसे?” (कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत.) येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे वरदान म्हणजे काय, आणि ‘मला प्यायला दे’, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते, तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जीवनदायक पाणी दिले असते.” ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवनदायक पाणी आपल्याजवळ कुठून येणार? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे ह्याच विहिरीचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण थोर आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल.

योहान 4:1-13 साठी चलचित्र