तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे क्रुसावर खिळले. ‘नासरेथकर येशू, यहुदी लोकांचा राजा’, असे एका पाटीवर लिहून ती पिलातने क्रुसावर लावली. येशूला क्रुसावर खिळले ते स्थळ शहराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुदी लोकांनी ती पाटी वाचली. ती हिब्रू, लॅटिन व ग्रीक ह्या भाषांत लिहिली होती. मुख्य याजक पिलातला म्हणाले, “‘यहुदी लोकांचा राजा’ असे लिहू नका, तर ‘मी यहुदी लोकांचा राजा आहे, असे त्याने म्हटले’, असे लिहा.” पिलातने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.” शिपायांनी येशूला क्रुसावर टांगल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी झगाही घेतला. त्या झग्याला शिवण नव्हती. तो वरपासून खालपर्यंत अखंड विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल ते चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे ह्यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर चिठ्या टाकल्या’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. येशूने त्याच्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” नंतर त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्यानंतर त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
योहान 19 वाचा
ऐका योहान 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 19:18-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ