ह्या गोष्टी बोलल्यावर येशू आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू तुझ्या पुत्राचा गौरव कर. तू त्याला जे दिले आहेत त्या सर्वांना त्याने शाश्वत जीवन द्यावे म्हणून तू सर्व मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहेस. शाश्वत जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे कार्य तू मला करायला दिलेस, ते पुरे करून मी तुझा पृथ्वीवर गौरव केला आहे. हे माझ्या पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी तुझ्याबरोबर माझे जे वैभव होते, तेच वैभव तुझ्या उपस्थितीत मला आता दे. जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस. त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस, ते सर्व तुझ्याकडून आले आहे. जी वचने तू मला दिलीस, ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्याकडून आलो, हे ते ओळखतात आणि तू मला पाठवले आहेस, असा ते विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. जे माझे आहेत ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही परंतु ते मात्र ह्या जगात आहेत. आता मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून, तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे संरक्षण कर. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावाने मी त्यांचे संरक्षण केले. मी त्यांचा सांभाळ केला. ज्याचा विनाश अटळ आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामधील कोणीही हरवला नाही. धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.
योहान 17 वाचा
ऐका योहान 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 17:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ