यहुदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभो, आपण स्वतः आमच्यासमोर प्रकट व्हाल आणि जगासमोर प्रकट होणार नाही हे कसे?” येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील आणि त्याच्यावर माझा पिता प्रीती करील व आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वसती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या, त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल. मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हांला देतो. जसे जग देते तशी मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. मी आता जातो आणि तुमच्याकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले, ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असेल तर मी पित्याकडे जात आहे, ह्याचा तुम्हांला आनंद होईल, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा सत्ताधीश येत आहे. पण त्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही. परंतु जगाने हे ओळखावे की, मी पित्यावर प्रीती करतो, म्हणून पिता जशी मला आज्ञा देतो, तसे मी करतो. उठा, आपण येथून निघू या.”
योहान 14 वाचा
ऐका योहान 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 14:22-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ