YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:4-15

योहान 11:4-15 MACLBSI

ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.” मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.” शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, तेथील लोक अलीकडेच तुमच्यावर दगडमार करू पहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाणार का?” येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो. परंतु तो रात्री चालला तर त्याला ठेच लागते, कारण तेव्हा उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.” शिष्य त्याला म्हणाले, “प्रभो, त्याला झोप लागली असेल, तर त्याला बरे वाटेल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.” तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी तेथे नव्हतो, ह्याचा मला आनंद वाटतो. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”

योहान 11:4-15 साठी चलचित्र

योहान 11:4-15शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती