YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना 5:2-6

गलतीकरांना 5:2-6 MACLBSI

पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली, तर त्याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ताची तुम्हांला काही गरज नाही. सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा बजावून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही देवाच्या कृपेला अंतरला आहात. आम्ही मात्र विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नीतिमान ठरण्याची आशा बाळगून वाट पाहत आहोत. कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.