तो उठला व निघाला आणि पाहा, हबशी राणीचा दरबारातील महत्त्वपूर्ण अधिकारी व खजिनदार असलेला एक हबशी षंढ यरुशलेमहून परत जात होता. तो उपासना करावयास गेला होता. तो परत जाताना त्याच्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.” फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले.
प्रेषितांचे कार्य 8 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 8:27-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ