पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत, तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला, त्यामुळे शेवटी आम्ही वाचण्याची आशा हळूहळू सोडून दिली. त्यांना पुष्कळ दिवस उपवास घडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, खरेच, तुम्ही माझे ऐकावयाला हवे होते. क्रेत बेटावरून निघावयाचे नव्हते म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल; कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘पौल, भिऊ नकोस. तुला कैसरपुढे उभे राहिले पाहिजे आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत, ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरवसा आहे की, त्याने मला जसे कळविले, तसेच घडेल.
प्रेषितांचे कार्य 27 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 27:20-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ